उत्फुल्ल प्रेक्षक सर्वं गुणगुणत आहेत. (गात आहेत)खाली बघ, खाली बघ खाली बघ, खाली बघ, मरेपर्यंत तुम्ही इथे आहात. तेजस्वी सूर्य. खाली असलेल्या नरकासारखाच तप्त! खाली बघ, खाली बघ , २० वर्षे जायची आहेत. मी काही अयोग्य केलेलं नाहीये, दयाळू जीझस , माझी प्रार्थना ऐक. खाली बघ, खाली बघ , दयाळू ख्रिस्ताला पर्वा नाही मला माहीत आहे ती वाट बघेल मला माहीत आहे की ती खरी असेल. खाली बघ, खाली बघ. ते सर्वं तुला विसरलेले आहेत. जेव्हा मी मुक्त होईन, तू मला पाहणार नाहीस. खाली बघ, खाली बघ, त्यांच्या डोळ्यांत बघू नकोस. अजून किती वेळ देवा ? तू मला मरू देण्यापूर्वी ? खाली बघ, खाली बघ , तू नेहमीच गुलाम राहशील. खाली बघ, खाली बघ , तू तुझ्या कबरीत उभा आहेस. कैदी २४६०१ हाजीर करा तुझी वेळ भरली आणि तुझा जामीन सुरु झाला तुला माहीत आहे याचा अर्थ? हो. म्हणजे मी मुक्त झालो. नाही. याचा अर्थ तू चोर आहेस- मी ब्रेडचा एक लोफ चोरला. तू घरावर दरोडा घातलास- मी खिडकीची चौकट तोडली. माझा भाचा मरायला टेकला होता आणि आमची उपासमार होत होती. तुझी परत उपासमार होईल , तू कायद्याचा अर्थ जाणून घेतला नाहीस तर. त्या १९ वर्षांचा अर्थ मला माहीत आहे. कायद्याचा एक गुलाम तू जे केलंस त्यासाठी ५ वर्ष, उरलेली तू पळून जाण्याचा प्रयत्न केलास त्यासाठी. हो, २४६०१ माझं नाव जीन व्हॅल्जिन! आणि मी जेव्हर्ट! विसरू नकोस माझं नाव मला विसरू नकोस, २४६०१ खाली बघ, खाली बघ, तू नेहमीच एक गुलाम राहशील. खाली बघ, खाली बघ , तू तुझ्या कबरीत उभा आहेस. (सर्व गुणगुणतात ) स्वातंत्र्य माझं आहे. पृथ्वी निःस्तब्ध निःशब्द आहे. मला वाऱ्याचा स्पर्श जाणवतो. मी पुन्हा श्वास घेतो. आणि माझे आकाश निरभ्र होते. जगाला जाग येत आहे. सरोवरातून पी, किती स्वच्छ चव ! कधीही विसरू नकोस वाया गेलेली वर्ष, विसरुही नकोस त्यांना, त्यांनी जे केलंय त्याबद्दल! ते दोषी आहेत, प्रत्येक जण! दिवस सुरु होतो आणि आता बघूया हे नवीन जग माझ्यासाठी काय करेल! तुला जावे लागेल. तू कायदा मोडलास. हा कायदा आहे. माझ्या हातातला हा कागदाचा कपटा मला या भूमीभर शापित ठरवतो. हा कायदा आहे. विश्रांती घ्या वेदनेपासून आणि विश्रांती घ्या अयोग्यापासून त्या सर्व १९ वर्षांत- आणि तरी त्याने माझ्यावर विश्वास ठेवला. चांदी घे माझं ऐक. मी करायलाच पाहिजे असं काहीतरी आहे. या स्त्रीने एक मूल मागे ठेवले आहे. मग मी परत येईन, मी शब्द देतो, मी परत येईन तू मला नक्कीच वेडा समजत असशील.मी तुला अनेक वर्ष झपाटलं आहे. तुझ्यासारखे पुरूष कधी बदलू शकत नाहीत तुझ्यासारखा पुरूष मी वचनबद्ध आहे एक कर्तव्य करण्यासाठी- तुझ्यासारखे पुरूष कधी बदलू शकत नाहीत. तुला माझ्या आयुष्याबद्दल काहीही माहीत नाहीये- क्र. २४६०१! तुला जगाचं काहीच माहीत नाहीये- तुला कोणतेही हक्क नाहीयेत. तू लवकरच मला मृत पाहशील- माझ्याबरोबर ये, २४६०१! पण मी हा न्याय झालेला पाहिल्याशिवाय नाही- आता चक्र फिरले आहे मी तुला ताकीद देतोय, जेव्हर्ट-खबरदार माझ्याशी गुन्ह्याबद्दल बोललास तर अजून माझ्यात ताकद आहे !- प्रत्येक जण पापात जन्मला आहे तिच्या नावाने आम्ही येथे संघर्ष करतो. तिचा विश्वासघात केला जाणार नाही. मी इथे स्वयंसेवक म्हणून आलो आहे. पुढे ये आणि तुझा चेहरा दाखव तू पायदळाचा गणवेश घातला आहेस. म्हणूनच त्यांनी मला आत येऊ दिले. तिथे असलेला तो कैदी बघितलास तू ? तुझ्यासारखाच स्वयंसेवक ! हेर जो स्वतःला जेव्हर्ट म्हणवतो. हे घे ; आणि योग्य प्रकारे वापर कर. पण तू आमच्या पाठीत खंजीर खुपसलास तर तू सांगण्यासाठी कधीही जिवंत राहणार नाहीस. आपण पुन्हा भेटलो. खूप बोलतोस तू. तुझे आयुष्य माझ्या हातांत सुरक्षित आहे. तू मुक्त आहेस, कोणत्याही अटींशिवाय तुला दोष देण्यासारखे माझ्याकडे काहीच नाही. तू तुझं कर्तव्य केलंस. जास्त नाही जर मी यातून जिवंत बाहेर पडलो तर तू मला ५५ रू प्लमेट येथे शोधू शकशील आपले रस्ते पुन्हा भेटतील शंकाच नाही. जा! सर्वांनी श्रद्धा ठेवावी माझ्याबरोबर गा आपल्याला माहीत असलेली गाणी ! मैत्रीची वाईन कधी कोरडी पडू नये. ते भविष्य आहेत. हे संगीत आहे लोकांचे जे प्रकाशाकडे वाटचाल करत आहेत. काळीकुट्ट रात्रसुद्धा संपेल आणि सूर्य उगवेल. ते पुन्हा स्वातंत्र्यात जगतील- देवाच्या उद्यानात शृंखला तोडली जाईल आणि सर्वांना त्यांचे पारितोषिक मिळेल. आमच्या धर्मयुद्धात सहभागी होशील तू? कोण ताकदवान असेल आणि माझ्यासह खडं राहील? कुठेतरी, या अडथळ्यांच्या पलीकडे , आहे का ते जग, ज्याला पाहण्यासाठी तू आसुसला आहेस? ऐकतोस तू लोक गाणी गाताना?सांग , ऐकतोस तू दूरवर वाजत असलेले ढोल? हेच का ते भविष्य, जे ते आणतील जेव्हा उद्याचा दिवस उजाडेल? आमच्या धर्मयुद्धात सहभागी होशील तू? कोण ताकदवान असेल आणि माझ्यासह खडं राहील? कुठेतरी, या अडथळ्यांच्या पलीकडे , आहे का ते जग, ज्याला पाहण्यासाठी तू आसुसला आहेस? ऐकतोस तू लोक गाणी गाताना?सांग , ऐकतोस तू दूरवर वाजत असलेले ढोल? हे भविष्य आहे जे ते आणतील जेव्हा "उद्याचा दिवस" येईल. (सर्व गातात ) जेव्हा "उद्याचा दिवस" येईल! (प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करतात)