[फायरफॉक्समध्ये नवीन काय आहे] सर्वात नवीन फायरफॉक्सचे वापर आता सोपे व वेगवान झाले आहे.
नवीन स्वरूपाच्या मुख्य पृष्ठासह नेहमी वापरले जाणाऱ्या मेन्यु पर्यायकरीता आता प्रवेश व संचारन सोपे झाले आहे.
जसे कि डाउनलोडस्, वाचखुणा, इतिहास, ॲडऑन्स्, सिंक व सेटिंग्स्.
[नवीन टॅब पृष्ठ] नवीन टॅब पृष्ठात सुधारणा देखील समाविष्टीत आहे.
नवीन टॅब पृष्ठासह, सर्वात नवीन व वारंवार भेट दिलेल्या स्थळांकरीता एकाच क्लिकमध्ये संचारन अकदी सोपे झाले आहे.
नवीन टॅब पृष्ठाचा वापर सुरू करण्यासाठी, ब्राउजरच्या शीर्षकातील '+' चिन्हावर क्लिक करून नवीन टॅब निर्माण करा.
नवीन टॅब पृष्ठ आता, ऑसम बार इतिहासपासून सर्वात नवीन व वारंवार भेट देणाऱ्या स्थळांचे थंबनेल्स् दाखवेल.
क्रमवारी बदलण्याकरीता थंबनेल्स् ओढून नवीन टॅब पृष्ठला पसंतीचे करणे शक्य आहे.
स्थळाला ठराविक ठिकाणी कुलूपबंद करण्यासाठी पुशपिनवर, किंवा स्थळाला काढून टाकण्यासाठी 'X' बटनावर क्लिक करा.
रिकाम्या नवीन टॅब पृष्ठावर पुनः जाण्यासाठी पृष्ठाच्या शीर्षातील उजव्या बाजूच्या 'ग्रिड' चिन्हावर क्लिक करणे देखील शक्य आहे.
सर्वात नवीन फायरफॉक्स प्राप्त करा व ह्या नवीन गुणविशेषांचा वापर आजच करा!